सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या बैठकीत घेतला निर्णय

सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ७० औषधे होणार स्वस्त

देशातील केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत काही औषधांच्या किंमती कमी केल्या आहेत. पेनकिलर आणि अँटिबायोटिक्ससह ७० अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी उपचार स्वस्त होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या (NPPA) झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या बैठकीत काही अत्यावश्यक औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनपीपीए हे देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित करते. बैठकीत चार विशेष औषधांसह ७० औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७० औषधांमध्ये वेदना कमी करण्यासाठीची औषधे म्हणजेचं वेदनाशामक, अँटिबायोटिक्स, ताप, संसर्ग, अतिसार, स्नायू दुखणे, मधुमेह, रक्तदाब, हृदय आणि इतर अनेक आजारांवरील औषधांचा समावेश आहे.

यापूर्वी जून महिन्यातही सरकारने अनेक जीवनावश्यक औषधांच्या किंमती कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने जूनमध्ये झालेल्या बैठकीत सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ५४ औषधांच्या आणि आठ विशेष औषधांच्या किंमती कमी केल्या होत्या. तसेच अँटीबायोटिक्स, मल्टी व्हिटॅमिन, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित औषधांच्या किंमती गेल्या महिन्यात कमी करण्यात आल्या होत्या. याशिवाय कॅन्सरसारख्या आजारांवर उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही स्वस्त करण्यात आली होती.

हे ही वाचा:

कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश

कुस्तीपटू विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम!

विनेश फोगाटसाठी कोणताही नियमांचा अपवाद नाही…तिला रौप्य दिले जाऊ शकत नाही…

बांग्लादेशात कम्युनिस्ट नेत्याची फासावर लटकवून हत्या !

औषधांच्या किमती कमी केल्याने देशातील करोडो लोकांना फायदा होणार आहे. गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर सरकारचा हा निर्णय आला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी हे देशात औषधांची उपलब्धता, त्यांच्या किंमती नियंत्रित करणे आणि औषधांमधील भेसळ थांबवणे यासारखी प्रमुख कामे करते. एनपीपीए ची स्थापना भारत सरकारने १९९७ मध्ये रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत केली होती.

Exit mobile version