सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या निर्णयामुळे परदेशात शिकायला जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठी मदत होणार आहे.
सिरम इन्स्टिट्युट भारतात कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करते. भारतातील लसीकरणामध्ये कोविशिल्डची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. परंतु युरोपातील काही देशांमध्ये मान्यता नसल्याने ही लस घेऊनही विद्यार्थ्यांना विलगीकरणात स्वखर्चाने रहावे लागत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे धोरण सीरमने ठरवले आहे. त्याबद्दल आदर पूनावाला यांनी ट्वीट करून माहिती दिली होती.
हे ही वाचा:
भारतीय महिला हॉकी संघाचे स्वप्न भंगले
आता खूप झाले! बेमुदत संप हेच याला उत्तर
मै तुम्ही खाना खिलाता हूँ, म्हणत रिक्षाचालकाने केला बलात्कार
सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की
परदेशी जाणाऱ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, कोविशील्डची लस घेतलेल्यांना काही देशांमध्ये अद्याप थेट प्रवेश मिळत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी क्वारंटाईन अनिवार्य आहे. या परिस्थितीत तुम्हाला काही खर्च येण्याची शक्यता आहे. यासाठी मी १० कोटींचा निधी ठेवला आहे. तुम्हाला गरज असल्यास कृपया अर्ज करा.
Dear students travelling abroad, as a few countries are yet to approve COVISHIELD as an acceptable vaccine for travel without quarantine, you may have to incur some costs. I have set aside Rs.10 crores for this, apply below for financial support if needed. https://t.co/CbD6IsdKol
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) August 5, 2021
याआधी ब्रिटननं भारत देशाचा समावेश रेड लिस्टमध्ये केला. मात्र त्यानंतर आता भारताला अँबर लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यामुळे भारतातून ब्रिटनमध्ये गेलेल्यांना १० दिवस विलगीकरणात राहावे लागते. ज्यावेळी भारत देश रेड लिस्टमध्ये होता त्यावेळी भारतातून गेलेल्या लोकांना संस्थानात्मक विलगीकरण अनिवार्य होते. मात्र अँबर लिस्टमध्ये समावेश होत असल्यानं आता घरी किंवा इतर अन्य ठिकाणी विलगीकरणात राहण्याची मुभा आहे. येत्या ८ ऑगस्टपासून भारताचा समावेश अँबर लिस्टमध्ये होणार आहे.