‘मदर्स डे’ च्या दिवशी भारतीय रेल्वेने देशभरातील महिलांना एक विशेष भेट दिली आहे. रविवार, ८ मे रोजी ‘मदर्स डे’ चे औचित्य साधून भारतीय रेल्वेतर्फे एका अभिनव संकल्पनेची सुरुवात करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये नव्याने ‘बेबी बर्थ’ बसवण्यात आला आहे.
लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या मातांसाठी रेल्वेने की खास सोय केली आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागातील लखनऊ दिल्ली गाडीमध्ये हे बर्थ बसवले आहेत. १९४१२९ लखनऊ मेल या गाडीमध्ये बी ९ या डब्ब्यात बर्थ क्रमांक १२ आणि ६० येथे ही सोय करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर म्हणून केवळ दोन बेबी बर्थ बसवण्यात आले आहेत. तर येणाऱ्या काळात या बर्थची संख्या वाढवून देशभरातील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हे बर्थ बसवण्याचा रेल्वेचा मानस आहे. भारतीय रेल्वे लखनऊ विभाग डिआरएम यांनी या संबधीत ट्विट करत माहिती दिली आहे.
Happy Mother's Day.
A baby berth has been introduced in Coach no 194129/ B4, berth no 12 & 60 in Lucknow Mail, to facilitate mothers traveling with their baby. Fitted baby seat is foldable about hinge and is secured with a stopper. @AshwiniVaishnaw @RailMinIndia @GM_NRly pic.twitter.com/w5xZFJYoy1— DRM Lucknow NR (@drm_lko) May 8, 2022
लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. स्तनपान करताना किंवा रात्रीच्या वेळी झोपताना आपल्या बाळासह त्यांना एकाच बर्थवर झोपावे लागते. यात महिलांची गैरसोय होते. म्हणूनच या सर्व अडचणींचा विचार करता भारतीय रेल्वेमार्फत महिलांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे ही वाचा:
महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न
‘आडनावांवरून पालिका कारवाई करते आहे का’?
ममता बॅनर्जीनी दिला स्वतःलाच पुरस्कार
‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!’ राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब
भारतीय रेल्वेतील खालचे बर्थ हे एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांसाठी, लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर त्यातच आता बेबी बर्थची सुविधा पुरवायलाही सुरूवात केल्यामुळे महिलांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.