मुंबईतील दिंडोशी येथील एका शाळेच्या तरण तलावात १४ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शार्दुल आरोलकर (१४) असे मृत मुलाचे नाव असून तो सामान्य मुलगा नव्हता तर तो स्पेशल चाईल्ड होता. गोरेगावच्या यशोधाम शाळेत तो पोहण्यासाठी जात होता.
शार्दुल हा बुडू लागताच त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला त्वरित पाण्याच्या बाहेर काढले. त्यानंतर त्याला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तो बोरिवली पश्चिम येथील योगी नगरमधील शासकीय वसाहतीत कुटुंबियांसोबत राहत होता.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी ‘ग्लोबल लीडर’, नऊ वर्षात १२ देशांमधील संसदेत संबोधन
पाटण्यामधील बैठक ही ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक
‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक
गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम
गेल्या सहा महिन्यांपासून शार्दुल शाळेतील तरण तलावात पोहण्याचे प्रशिक्षण घेत होता. त्याचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले होते. या तरण तलावात चार प्रशिक्षक होते. त्यातील मुख्य प्रशिक्षक सागर शार्दुलला पोहण्याचे प्रशिक्षण देत होता. शुक्रवारी दुपारी १२ वाजता शार्दुल तरण तलावात बुडू लागला. त्याला प्रशिक्षकाने पाण्यातून बाहेर काढले. त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी शार्दुल याची आईही हजर होती. डॉक्टरांनी शार्दुलची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शार्दुलचे वडील संजय आरोलकर यांनी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली आहे.