१०० वर्षांची वृद्ध महिला पंतप्रधान मोदींना देणार १५ एकर जमीन!

मध्य प्रदेशमधील वृद्ध महिलेची इच्छा

१०० वर्षांची वृद्ध महिला पंतप्रधान मोदींना देणार १५ एकर जमीन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी मध्य प्रदेशच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान, राजगड जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला मुलगा मानला असून त्यांना भेट देऊ केली आहे. तसेच मोदी यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिका आणि इटली या दोन देशांच्या परदेश दौऱ्यावरून परतलेले नरेंद्र मोदी आता मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा एक दिवसाचा दौरा आहे. यावेळीच राजगड जिल्ह्यातील एका वृद्ध महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले आहे. या महिलेचे वय १०० वर्ष असल्याची माहिती आहे. तारे, त्यांचे नाव मांगी बाई आहे.

मांगी बाई यांना स्वतःची १४ मुले आहेत. मात्र, असे असतानाही तिने आपली १५.४७५ एकर म्हणजेच २५ बीघे जमीन पंतप्रधान मोदींना देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांना पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची देखील इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वृद्ध महिलेला स्वतःची १४ मुले असूनही मोदी आपले स्पेशल लेक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

जैन मंदिरात आता जीन्स, हाफ पँट, फ्रॉक किंवा फाटलेले कपडे बंद

कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई

दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख

‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’

मांगी ही वृद्ध महिला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील हरिपुरा जागीर गावातील रहिवासी आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वय १०० वर्ष आहे. त्यांनी आपल्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला असून तो फोटो त्या रोज सकाळी जवळ घेऊन पाहतात. “पंतप्रधान मोदी मला मदत करत आहेत. त्यांच्यामुळे दर महिन्याला गहू आणि पेन्शन मिळते. माझी १४ मुलं आहेत मात्र नरेंद्र मोदी देखील माझा मुलगा आहे. मला माझी २५ बीघे जमीन त्यांना द्यायची आहे. मला पंतप्रधानाना भेटाण्याची इच्छा आहे,” असे मांगी म्हणाल्या.

Exit mobile version