पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने भारताचे आणखी एक पाऊल

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन!

देशात मोदी सरकार आल्यानंतर महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत, केल्या जात आहेत. सरकारकडून महिला सक्षमीकरणासाठी जास्त भर दिला जात आहे. याच मालिकेत आज (९ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन झाले आहे. हरियाणाच्या पानिपत येथून ‘विमा सखी योजने’चे उद्घाटन पंतप्रधानांनी केले. ‘विमा सखी योजना’ ही भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) ही नवी योजना आहे.

या योजनेतून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार पाऊल टाकत आहे. एलआयसी ‘विमा सखी योजना’ लाँच करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हरियाणातील डबल इंजिन सरकार दुप्पट वेगाने काम करत आहे. आपल्या देशात बऱ्याच काळापासून अशा अनेक नोकऱ्या होत्या, ज्या महिलांसाठी निषिद्ध होत्या, परंतु आमच्या भाजपा सरकारने मुलींसमोर येणारे सर्व अडथळे दूर करण्याचे ठरवले आहे. ते पुढे म्हणाले, आज लाखो मुलींना विमा सखी बनवण्याची मोहीम सुरू केली जात आहे, म्हणजे ज्या सेवेपासून ते एकेकाळी वंचित होते, आज त्यांना त्याच सेवेशी इतर लोकांना जोडण्याची जबाबदारी दिली जात आहे.

विमा सखी योजना काय आहे?

विमा सखी योजनेअंतर्गत १८ ते ७० वर्षे वयोगटातील १०वी उत्तीर्ण महिलांना विमा एजंट बनवले जाणार आहे. योजनेअंतर्गत लोकांमध्ये आर्थिक समज वाढवण्यासाठी आणि विम्याचे महत्त्व सांगण्यासाठी शिक्षित महिलांना पहिली ३ वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एलआयसीकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिला विमा एजंट म्हणून काम करू शकतील. विमा सखी योजने अंतर्गत येणाऱ्या तीन वर्षात २ लाख महिला विमा एजंटची नियुक्ती केली जाणार आहे. योजनेंतर्गत, प्रत्येक महिला एजंटला पहिल्या वर्षी दरमहा ७,०००  रुपये, दुसऱ्या वर्षी ६,००० रुपये आणि तिसऱ्या वर्षी ५,०००  रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.

हे ही वाचा : 

तुम्ही आमच्यावर कब्जा कराल तर आम्ही लॉलीपॉप खात बसू का?

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन

१०३ शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलं… राज ठाकरे वक्फ बोर्डाविरोधात

लोकसभेतं मविआला ईव्हीएम गारगार वाटलं आणि आता गरम वाटतंय!

 

 

Exit mobile version