27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषबांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार, ९८ जणांचा मृत्यू !

बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार, ९८ जणांचा मृत्यू !

भारताने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला

Google News Follow

Related

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार वाढला आहे. नोकरीमधील आरक्षण संपवण्याच्या मागणीसाठी सुरु असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन उग्र बनले आहेपंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. विद्यार्थी आंदोलकांची पोलीस आणि सत्तारुढ पार्टीच्या कार्यकर्त्यांशी झटापट झाल्याने यामध्ये आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आणि स्टन ग्रेनेडचा वापर केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेट बंद करण्यात आली आहे. दरम्यान, भारताने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आपल्या सर्व नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला न जाण्यासही त्यांनी आपल्या नागरिकांना सांगितले आहे.

हे ही वाचा..

युद्धबंदीची चर्चा अयशस्वी, इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात ४४ जणांचा मृत्यू !

महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन पडले महागात, टीएमसी मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा !

या हिंदू द्वेष्ट्याचे उद्धव ठाकरे कान उपटणार का?

बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार भडकला, ३२ जणांचा मृत्यू !

दरम्यान, बांग्लादेशाच्या सुप्रीम कोर्टाने आरक्षणाचा कोटा ५६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणला आहे परंतु अजूनही निदर्शने सुरूच आहेत. आता तर पंतप्रधान हसीना शेख यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेचा निषेध करून ‘निषेधाच्या नावाखाली सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारे विद्यार्थी नसून दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. मागील महिन्यात झालेल्या हिंसाचारात तब्बल २०० जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो जण जखमी झाले होते. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल ११,००० पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा