ज्येष्ठ्य अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ‘नव्वदीतील नटसम्राट’ मधून त्यांच्या प्रतिभेचे लखलखीत दर्शन झाले होते. अफाट उत्साह, जबरदस्त संवादफेक आणि तल्लख स्मरणशक्ती अखेरपर्यंत त्यांच्या सोबत राहिली. मोहनदास सुखटणकर यांनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकामध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष गाजली होती. याशिवाय ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’ या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी केलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गा’, ‘स्पर्धा’, ‘मत्स्यगंधा’ सारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहेत. मोहनदास यांनी अनेक दशके मराठी रंगभूमीची सेवा केली. मराठी नाटकांमध्ये मोहनदास सुखटणकर यांचं मोलाचं योगदान आहे. त्याबरोबरच ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. तसेच ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही ते झळकले होते. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विनोदी अभिनेता समीर चौघुले यांनी सुखटणकर यांच्या भेटी बद्दल इन्स्टाग्राम वर आठवणीना उजाळा दिला आहे
हे ही वाचा:
जी-२०च्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार गैरहजर
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांच्या जाण्यानं रंगभूमी पोरकी झाली आहे. मोहनदास यांनी ‘गोवा येथील हिंदू असोसिएशन’च्या माध्यमातून अनेक वर्ष नाट्यसेवा केली. ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चं मोहनदास यांच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. ‘मोहनदास सुखटणकर’ यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडिल म्हणजेच श्रीपाद सुखटणकर हे गोव्यातील प्रसिद्ध डॉक्टर होते. तसंच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा हातभार होता. त्यामुळे मोहनदास यांचं बालपण आणि प्राथमिक ते दहावीपर्यंतचं शिक्षण गोव्यातील माशेल आणि म्हापसा येथे झाले.