26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषमुंबईच्या तलावांना हवे फक्त १० टक्के पाणी!

मुंबईच्या तलावांना हवे फक्त १० टक्के पाणी!

Google News Follow

Related

ऑगस्टमध्ये दडी मारलेल्या पावसाने मुंबईत आणि उपनगरांत पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

मुंबईची तहान भागावणाऱ्या सातही तलावात ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तरीही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमीच आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापही १० टक्के तूट आहे.

जुलै महिन्यात मुंबईत आणि आसपासच्या क्षेत्रात चांगलाच पाऊस पडला होता. तेव्हा तलावातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली होती. मात्र नंतर पाऊस नसल्यामुळे धरणातील पाणी साठ्याच्या वाढही मंदावली होती. तलाव क्षेत्रातही पाऊस कमीच होता. सप्टेंबरच्या  सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. मुंबई, पालघर, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यामुळे धरणात पाणी साठ्याची वाढ होण्याची आशा आहे.

हे ही वाचा:

अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र

दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर

जितेंद्र आव्हाडांच्या ‘कथित’ ऑडियो क्लिपमुळे ‘साहेबांचे’ महिला धोरण पुन्हा चर्चेत

पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा

सप्टेंबरच्या अखेरीस सातही तालावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटरवर पोहचले तरच मुंबईला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करणे शक्य होते. १ ऑक्टोबरला तलावातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल यादृष्टीने पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे नियोजन केले जाते. मात्र सध्या असलेला जलसाठा हा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कमी आहे. शुक्रवारपर्यंत सातही तलावात मिळून १३ लाख १४ हजार ११३ दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजेच ९०.७९ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

उर्ध्व वैतरणामध्ये ७९.७० टक्के पाणीसाठा आहे. मोडक सागरमध्ये ९०.२५ टक्के पाणीसाठा आहे. तानसामध्ये ९८.८९ टक्के पाणीसाठा आहे. मध्य वैतरणामध्ये ९४.४७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. भातसामध्ये ९१.३१ टक्के पाणीसाठा असून विहारमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. तुळशीमध्ये ९९.५६ टक्के पाणीसाठा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा