हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील पोंटा साहिब येथे असलेल्या हिमाचल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला.प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी झाल्याने ९० फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कॉलेज व्यवस्थापनाने शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.या प्रकारामुळे कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी ९० विद्यार्थीं संस्थेबाहेर राहुल्यामुळे कॉलेज व्यवस्थापनाकडून २,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.एवढेच नाहीतर विद्यार्थ्यांनी दंड न भरल्यास संस्था सोडण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.संस्थेच्या या कृतीमुळे पांवटा साहिब येथील हिंदू संघटना संतप्त झाल्या आणि त्यांनी संस्थेच्या गेटवरच गोंधळ घातला.महत्त्वाची बाब म्हणजे २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
काही विद्यार्थ्यांनी कॉलेजवर आरोप केला की, २५०० रुपयाचा दंड भरण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांवर कॉलेजकडून दवाब आणला जात आहे.विशेष म्हणजे २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी २३ जानेवारी रोजी सर्व ९० विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आले आणि दंड न भरल्यास त्यांना संस्थेतून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली.
हे ही वाचा:
जगज्जेती मेरी कोम हिची बॉक्सिंगमधून निवृत्ती!
राम मंदिरात पहिल्या दिवशी तीन कोटी १७ लाखांची देणगी!
विजय पाटिदारची निवड योग्य, मात्र अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळणे कठीण!
उज्जैनमध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्यावर जमावाचा हल्ला, दोन्ही गटांकडून दगडफेक!
दुसरीकडे संस्थेच्या या कृतीमुळे स्थानिक हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. विविध हिंदू संघटनांच्या लोकांनी कॉलेजच्या गेटवर निदर्शने करत कॉलेज प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रामलला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुलांना हजेरी लावण्यासाठी संस्थेने तालिबानी आदेश देऊन धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे. हिंदू संघटनांचे लोक संस्थेच्या एचओडीला बडतर्फ करण्याची आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
प्रकरण चिघळत असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप केला. डीएसपी पांवटा व तहसीलदार पांवटा साहिब यांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांशी तसेच संस्था प्रशासनाशी चर्चा केली. सध्या प्रशासनाने हा गोंधळ शांत केला आहे. सध्या एचओडीला ५ फेब्रुवारीपर्यंत रजेवर पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य करण्यात आले आहे. अशा स्थितीत संतप्त हिंदू संघटनांनी आंदोलन तूर्तास संपवले आहे. तहसीलदार पोंटा साहिब ऋषभ शर्मा यांनी प्रकरण शांत केल्याचे सांगितले. तपास केला जात आहे. या प्रकरणाबाबत संस्थेचे उपाध्यक्ष फार्मा डॉ. अभिनय पुरी यांनी सांगितले की, संस्थेने आपल्या स्तरावर एक समिती स्थापन केली आहे, ज्यामध्ये दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाईल.