मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट; भारतातील ९० यात्रेकरूंचा मृत्यू!

सौदी अरेबियातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याने दिली माहिती

मक्कामध्ये उष्णतेची तीव्र लाट; भारतातील ९० यात्रेकरूंचा मृत्यू!

सौदी अरेबियाच्या मक्का येथील यंदाच्या हज यात्रेदरम्यान किमान ९० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेक भारतीय बेपत्ता आहेत, अशी माहिती सौदी अरेबियातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मक्का येथे तापमानाने उच्चांक गाठला असून यात यंदा ६४५ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे.

‘एकूण ९० नागरिकांचा मृत्यूला आम्ही दुजोरा देतो. काही नैसर्गिक कारणांमुळे आहेत. यात्रेत अनेक वृद्ध यात्रेकरूंचाही सहभाग होता. तसेच, विपरित हवामानामुळेही काही मृत्यू झाले आहेत, असे आम्ही सांगू शकतो,’ असे एका भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

अनेक भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची नोंद आहे, परंतु त्यांनी त्यांची अचूक संख्या देण्यास नकार दिला. तसेच, असे दरवर्षी घडते, ही परिस्थिती मागील वर्षांसारखीच आहे, लवकरच पुढील तपशील अपेक्षित आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या हज यात्रेसाठी दरवर्षी लाखो लोक सौदी अरेबियातील मक्का येथे इस्लामिक महिन्यात येतात. प्रत्येक मुस्लिमाने त्यांच्या आयुष्यात एकदा तरी ही धार्मिक जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे मानले जाते.

हे ही वाचा..

६७ वर्षांचा वृद्ध होऊन कॅनडाला जात होता २४ वर्षांचा तरुण!

तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने २५ जणांनी गमावला जीव

हरमन, स्मृतीची शतके; थरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारताची दक्षिण आफ्रिकेवर मात

१४ खरिप पिकांना केंद्राकडून किमान आधारभूत किंमत जाहीर; दीडपट मोबदला मिळणार

मात्र या वर्षीच्या यात्रेत तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळते आहे. अलीकडच्या दशकातील हे सर्वोच्च तापमान आहे.
सौदीच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, मक्का येथील तापमान दर दशकात ०.४ अंश सेल्सिअसने वाढते आहे. सन २०२३ मध्ये, हज यात्रेदरम्यान २००हून अधिक यात्रेकरू मरण पावले आणि तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यामुळे दोन हजारांहून अधिक लोकांना उष्णतेशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला.

१८ जून रोजी इतर अरब राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, सन २०२४च्या हजमध्ये ५५० मृत्यूंची नोंद झाली होती, त्यात ३२३ इजिप्शियन आणि ६० जॉर्डनच्या नागरिकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. तर, इराण, इंडोनेशिया, ट्युनिशिया, सेनेगल आणि इराकचा कुर्दिस्तान प्रदेश येथीलही काही यात्रेकरू मरण पावले आहेत.

Exit mobile version