मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

आज, १६ सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ ठार

राज्यासह देशात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे लष्कराच्या छावणीच्या भिंत कोसळून नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज, १६ सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये मुसळधार पावसामुळे लष्करी छावणीच्या सीमेवरचे भिंत कोसळली. ही भिंत कोसळल्याने नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भिंत कोसळल्यानंतर मलब्याखालून एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण बांधकाम मजूर होते.

पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर ३ वाजता लष्कराचे जवान घटनास्थळी पोहचले. लखनौच्या दिलकुशा भागात लष्कराची छावणी आहे. काही बांधकाम मजूर छावणीच्या भिंतीला लागून झोपड्यांमध्ये राहतात. लष्कराच्या छावणीची भिंत झोपड्यांवर पडली त्यामुळे झोपड्यांमध्ये राहणारे नऊ जणांचे प्राण गेले आहेत. आतापर्यंत जवानांनी नऊ मृतदेह ढिगाऱ्याकडून बाहेर काढले असून, एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात लष्कराच्या जवानांना यश आलं आहे. त्या जिवंत कामगाराला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.

हे ही वाचा:

मुंबईत सकाळपासून दमदार, जोरदार

‘प्रिन्स चार्ल्स पायउतार होतील’ कोण म्हणतंय असं

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून समन्स

२४ वर्षांच्या कारकिर्दीत २० ग्रँड स्लॅम खिताब जिंकणाऱ्या रॉजर फेडररचा टेनिसला अलविदा

उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर लखनौ आणि झाशी येथील जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा सूचना जारी करून जिल्ह्यातील सर्व सरकारी, निमशासकीय किंवा खासगी शाळांमध्ये बारावीपर्यंत सुट्टी जाहीर झाली आहे. याशिवाय झांशीमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने शुक्रवारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version