महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?

महाराष्ट्र अलर्टवर! ओमिक्रोन मुंबईच्या उंबरठ्यावर?

जगभरात धुमाकूळ घातलेल्या ओमिक्रोनने भारतात शिरकाव केला असून कर्नाटकमध्ये ओमिक्रोनचे दोन रुग्ण सापडले आहेत. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्राची आणि विशेषतः मुंबईची चिंता वाढवणारे वृत्त समोर आले आहे. नऊ परदेशातून आलेल्या प्रवाशांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले असून त्यातील एक प्रवासी हा दक्षिण आफ्रिकेवरून आला आहे.

हे ही वाचा:

ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह

वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?

शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार १० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांपैकी नऊ जणांचे कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. परदेशातून आलेल्या या प्रवाशांपैकी एक जण दक्षिण आफ्रिकेमधून आला आहे. या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आता या रुग्णांना ओमिक्रोनची बाधा झाली की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भारतात कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असून ओमिक्रोनचा शिरकाव झालेला आहे. या दोन ओमिक्रोन पेशंट पैकी एकाच्या संपर्कातले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रासह देश अलर्टवर आहे. कर्नाटकमध्ये रुग्ण सापडू लागल्याने महाराष्ट्रामध्ये चिंता वाढली असून महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातून म्हणजेच कर्नाटकमधून महाराष्ट्रात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात ये- जा सुरू असते. आता मुंबईत सापडलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली आहे.

Exit mobile version