सौदी अरेबियात एका भीषण रस्ता अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. जेद्दाह येथील भारतीय दुतावासाने याबाबत माहिती दिल. पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ हा अपघात झाल्याचे दुतावासाने म्हटले आहे. एका निवेदनात, वाणिज्य दूतावासाने पीडित कुटुंबांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आणि पुष्टी केली की ते स्थानिक अधिकारी आणि पीडितांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत.
भारतीय वाणिज्य दूतावासाने एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सौदी अरेबियाच्या पश्चिम विभागातील जिझानजवळ झालेल्या रस्ते अपघातात ९ भारतीय नागरिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो.” पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आमची मनापासून संवेदना. जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावास पूर्ण मदत करत आहे आणि अधिकारी आणि कुटुंबांच्या संपर्कात आहे. तसेच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले, अपघात आणि मृत्यूबद्दल जाणून घेतल्याने मला दुःख झाले आहे. ते पुढे म्हणाले, जेद्दाहमधील आमच्या कौन्सुल जनरलशी बोललो, ते संबंधित कुटुंबांच्या संपर्कात आहेत. या दुःखद परिस्थितीत ते पूर्ण सहकार्य करत आहेत,” असे जयशंकर म्हणाले.
हे ही वाचा :