शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !

दरडीखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरु

शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !

हिमाचल प्रदेशातील शिमला येथे सोमवारी मुसळधार पावसामुळे शिवमंदिर कोसळल्याने तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी ट्विट करून दिली.दरडीखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) अधिकारी बचाव कार्य करत आहेत.

सध्या श्रावण महिना सुरु आहे तसेच आज सोमवार असल्याने शिव मंदिरात मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी असते.शिमल्याच्या समरहिल येथील बाळूगंजच्या शिव बावडी मंदिराजवळ दरड कोसळली.आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.या दरडीखाली २० ते २५ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखालून नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या संख्येने भाविक मंदिरात पोहोचले होते. दुसरीकडे, शिमल्याच्या लाल कोठीमध्ये भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळाला भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सांगितले.

हे ही वाचा:

सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण

पीएफआय षडयंत्र प्रकरणी एनआयएकडून ५ राज्यांत १४ ठिकाणी छापे!

भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा

पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या गटावर दहशतवादी हल्ला

पाऊस आणि भूस्खलनामुळे हमीरपूरच्या सर्व भागात पिके, सुपीक जमीन आणि अधिकृत आणि खाजगी इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना बाहेर पडू नये आणि बियास नदीकाठ आणि नाल्यांजवळ जाण्याचे टाळण्याचा इशारा दिला आहे.

हिमाचल प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आहे. भूस्खलनामुळे शिमला-चंदीगड या प्रमुख रस्त्यासह अनेक रस्ते अडल्याने बस आणि ट्रक साठी हे मार्ग बंद करण्यात आले आहे.वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये १४ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा राज्याने केली आहे.

 

Exit mobile version