कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक

कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी घट झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या ८८ दिवसात पहिल्यांदाच नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ५४ हजारांच्या खाली गेला. कालच्या दिवसात ५३ हजार २५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात १ हजार ४२२ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट झाल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

गेल्या २४ तासात भारतात ५३ हजार २५६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ४२२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ७८ हजार १९० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

हे ही वाचा:

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी

हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट

आता विधि अभ्यासक्रम पदवीचा गोंधळ

शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९९ लाख ३५ हजार २२१ वर गेला आहे. देशात २ कोटी ८८ लाख ४४ हजार १९९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८८ हजार १३५ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ७ लाख २ हजार ८८७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २८ कोटी ३६ हजार ८९८ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version