कोरोनामुळे सध्या महाराष्ट्राची अवस्था गंभीर झाली आहे. दर दिवशी मोठ्या संख्येने करोनाचे रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने काही रुग्णांनी प्राण गमावले आहेत. मदतीचे हातही पुढे येत आहेत. पण दुसऱ्या रुग्णाचे प्राण वाचावे यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे अगदी विरळा. नागपूरचे ८५ वर्षीय संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर काका यांनी हा महान आदर्श घालून दिला. नागपूरचे रहिवासी असलेल्या नारायण दाभाडकर यांना कोविडची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात बेड उपलब्ध व्हावा, यासाठी त्यांच्या मुलीने खूप प्रयत्न केले. अखेरीस त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखला मिळाला. परंतु तोपर्यंत त्यांची प्राणवायूची पातळी खालावली होती.
ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यावेळी त्यांचा श्वास गुदमरला होता. त्याचवेळी रुग्णालयात त्यांनी एका स्त्रिला तिच्या चाळीशीतील पतीसाठी बेड मिळावा याकरिता विनंती करताना, रडताना पाहिले. त्या माणसाची मुले देखील रडत होती.
हे ही वाचा:
सौदी अरेबियातील विद्यार्थी गिरवतायंत रामायण, महाभारताचे धडे
भाजपा साजरा करणार ऑनलाईन विजयोत्सव
…आणि चिदंबरम यांच्यावर लोक चिडले!
गडकरींमुळे महाराष्ट्रातून विकासाचा ‘मार्ग’
नारायण दाभाडकर काकांना ते दुःख पाहावले नाही. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले की, मी ८५ वर्षांचा आहे आणि मी माझे जीवन सुखाने जगलो आहे. तुम्ही त्या गृहस्थाला माझा बेड द्या, त्याला मुलं-बाळं आहेत. त्यांनी आपल्या निर्णयाबद्दल त्यांच्या कुटुंबियांना देखील सांगितले.
कुटुंबियांनी सुरूवातील थोडे आढेवेढे घेतले. परंतु नंतर नारायणरावांचा निर्णय मान्य केला आणि त्यांचा बेड त्या गृहस्थाला दिला. त्यांना परत घरी आणण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांनी नारायणरावांची प्राणज्योत मालवली. आपला मृत्यू समोर दिसत असतानाही दाभाडकर काकांनी दाखविलेल्या या असीम धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल संघ परिवारातून शोक व्यक्त केला जात आहे