मुंबईतील मानसिक आरोग्य विषयक समस्यांमध्ये घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रज्ञा फाउंडेशनने केलेल्या अहवालातून हे चित्र समोर आले आहे. आकडेवारीनुसार सन २०१८-१९ मध्ये शहर उपनगरात मानसिक आरोग्याच्या समस्या असलेले १ लाख १० हजार २५७ रुग्ण आढळले होते, तर सन २०१९- २० मध्ये ही संख्या ९० हजार ६७४ इतकी होती. २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० ला रुग्णांच्या संख्येत १८ टक्क्यांनी घट झाली होती.
सन २०२०-२१ मध्ये ४१ हजार १५९ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना काळात मानसिक आरोग्याविषयी बोलणे झाल्यामुळे मानसिक आजार झालेल्या रुग्णांना उपचारांच्या प्रवाहात आणले गेले, असे अहवालात नमूद केलेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या रुग्णांच्या संख्येत ५५ टक्क्यांनी घट झाली आहे.
हे ही वाचा:
बसच्या लोकेशनची यंत्रणा तर बसविली, पण अॅप सुरूच नाही!
‘त्या’ १२ षटकांनी वाजवले राजस्थानचे बारा!
हिटमॅनचा आणखीन एक सुपरहिट रेकॉर्ड! ठरला पहिलाच भारतीय
रावणाची भूमिका करणारे त्रिवेदी यांचे निधन
मानसिक समस्यांमुळे २०१७ मध्ये ४४७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या २०१९ मध्ये ४७५ रुग्णांवर पोहचली होती. सन २०१७ ला मृत्यू झालेल्या रुग्णांचा वयोगट हा ५ ते १९ वर्षे, तर २०१९ मध्ये वयोगट २० ते ३९ वर्षातील नागरिकांचा मृत्यू झाला होता.
प्रज्ञा फाउंडेशनने कलेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार कोरोनाकाळात ८४ टक्के मुंबईकरांनी मानसिक तणावातून गेल्याची कबुली दिली आणि त्यातील केवळ चार टक्के मुंबईकरांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घेतले. इतरांनी याविषयी अव्यक्त राहणे पसंत केल्याचे समोर आले. ७ टक्के मुंबईकरांना यावर उपचार करणे योग्य वाटत नसल्याचे म्हटले आहे. ८३ टक्के मुंबईकरांनी मानसिक ताण नसल्याचे म्हटले आहे. अजूनही मानसिक समस्यांविषयी मुंबईकरांमध्ये जागृती नसल्यामुळे यंत्रणांनी मानसिक आरोग्यविषयक जनजागृती करावी, असे आह्वान अहवालात केले आहे.