८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!

अमेरिकेतील थिंक टँक असलेल्या प्यू रिसर्स सेंटरच्या अहवालातील आकडेवारी

८० टक्के भारतीय म्हणतात पुन्हा मोदीच!

अमेरिकेतील थिंक टँक असलेल्या प्यू रिसर्च सेंटरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि प्रभावाबाबत हा अहवाल असून या अहवालानुसार दहापैकी आठ म्हणजेच ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. जी- २० परिषदेपूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला.

अलिकडच्या काळात मोदींच्या नेतृत्त्वात भारताचा जागतिक प्रभाव वाढल्याचा विश्वासही १० पैकी सात भारतीयांनी व्यक्त केला आहे. सर्वेक्षणात जगभरातील लोकांचे भारताविषयीचे मत हे सामान्यत: सकारात्मक होते. सरासरी ४६ टक्के लोकांनी भारताबाबत अनुकूल मत व्यक्त केलं. तर ३४ टक्के लोकांचं मत प्रतिकूल होते. तर, १६ टक्के लोकांनी कोणतेही मत व्यक्त केलेलं नाही. दहापैकी आठ म्हणजेच ८० टक्के भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन असल्याची बाब नोंदविण्यात आली आहे.

जगातील २४ देशांमध्ये २० फेब्रुवारी पासून २२ मे दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आल्याचं प्यू- रिसर्च सेंटरने जारी केलेल्या अहवालात सांगितलं आहे. या सर्वेक्षणादरम्यान ३० हजार ८६१ लोकांशी संवाद साधण्यात आला.

हे ही वाचा:

 

‘इंडिया’च्या बैठकांचे आयोजन करणारे उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार पायदळी उडवतायत

भारतात होणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय- २०२३’ परिषद

अजितदादांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, शरद पवारांनी पुतण्याविरोधात दंड थोपटले

प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात परदेशातील भारतीयांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा विश्वास व्यक्त दाखवला आहे. दहापैकी आठ भारतीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. नरेंद्र मोदी हे २०१४ पासून सत्तेत आहेत आणि पुढच्या निवडणुकीत तिसरी टर्म देखील तेच पंतप्रधान असावेत असे त्यांचे मत आहे. याशिवाय दहा पैकी सात भारतीयांना वाटते की गेल्या काही वर्षात भारताचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे परदेशात भारताचा दर्जा उंचावला आहे हे बहुतांश भारतीय मान्य करतात. जगामध्ये भारताचा दबदबा वाढला आहे का, असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ६८ टक्के लोकांनी पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा प्रभाव वाढल्याचं सांगितलं.

Exit mobile version