चेन्नईहून निघालेल्या भारत गौरव स्पेशल ट्रेनमधील सुमारे ८० प्रवाशांनी पोटात दुखणे व मळमळ होत असल्याची तकार केली.रात्री १०.४५ च्या सुमारास पुणे स्थानकावरील रेल्वे अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली.ही ट्रेन गुजरातमधील पालिताना यात्रेच्या दौऱ्यासाठी एका खाजगी पक्षाने बुक केली होती.
या ट्रेनमध्ये सुमारे १,००० प्रवासी प्रवास करत होते.रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की, अनेक प्रवाशांना चक्कर येणे, पोटदुखी, उलट्या होणे अशा समस्या प्रवाशांना जाणवत आहे.त्यानंतर आमच्याकडून रेल्वे रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक आणि वैद्यकीय मदत देण्यासाठी इतर रेल्वे अधिकाऱ्यांना पुणे स्थानकावर पाठवण्यात आले, असे पुणे रेल्वे विभागाचे विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आणि पीआरओ रामदास भिसे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
‘भारताने हमासला प्रतिबंधित संघटना म्हणून जाहीर करावे’!
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पीएफ घोटाळा प्रकरणी गुन्हा
ठाकरे गटाचे उपनेते, माजी महापौर दत्ता दळवींना अटक; मुख्यमंत्र्यांवरचे आक्षेपार्ह विधान भोवले
१७ दिवसांनी त्या कामगारांनी पाहिला प्रकाश
रात्री ११.२५ वाजता ट्रेन पुणे स्थानकावर आली.प्रवाशांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.”प्रवाशांना ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरवून उपचार देण्यात आले. सुदैवाने, कोणत्याही प्रवाशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले नाही. उपचार घेतल्यानंतर, ट्रेन, सर्व प्रवाशांसह, सकाळी १२.३० च्या सुमारास पुणे स्टेशनवरून निघाली,” भिसे पुढे म्हणाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गाडी सुटण्यापूर्वी गाडीची संपूर्ण तपासणी करण्यात आली.ट्रेनमध्ये पॅन्ट्रीची सुविधा नव्हती.सोलापूरपासून अंदाजे १८० किमी अंतरावर असलेल्या वाडी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना जेवण मिळाल्याची माहिती मिळाली.प्रवाशांना अन्न कोठून मिळाले याचा शोध आम्ही घेत आहात.सूत्रांनी असेही सांगितले की,ट्रेन यात्रेसाठी जात असल्यामुळे देणगी स्वरूपात अन्न देण्यात आले होते.प्रवाशांना देखील याची माहिती होती.आत्तापर्यंत, आम्हाला माहित आहे की रेल्वेने प्रवाशांना जेवण दिलेले नाही.तथापि, तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.