गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी मोदी सरकारची विशेष भेट

गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी मोदी सरकारची विशेष भेट

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोदी सरकारने विशेष भेट दिली आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला वाजत गाजत घरी आणण्यासाठी आपल्या मूळ गावी परतणाऱ्या कोकणवासीयांसाठी सरकारने अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडायचे ठरवले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून यासंबंधीची माहिती दिली आहे.

गणेश उत्सव हा महाराष्ट्रासाठी आणि त्यातही प्रामुख्याने कोकणवासीयांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा सण असतो. नोकरीच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यात येऊन स्थायिक झालेला कोकणी माणूस दरवर्षी गणेशोत्सवाला मात्र कोकणातल्या आपल्या गावी जातोच जातो. या संपूर्ण काळात कोकणच्या दिशेने धावणाऱ्या बस आणि रेल्वे गाड्यांवर चांगलाच ताण पडलेला दिसतो.

हे ही वाचा:

पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक

ठाकूर तो छा गियो

२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत

रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग

या सर्व गोष्टी लक्षात घेता दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त सरकारमार्फत काही ना काहीतरी अतिरिक्त सोय केली जाते. तशी सोय यावर्षीही करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वे मार्फत यावर्षी कोकणसाठी आठ विशेष गाड्या धावणार आहेत. या आठही गाड्या वातानुकुलीत असणार आहेत. गणेशोत्सव काळात आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बाब असणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयासाठी कोकणवासी त्यांचे आभार मानताना दिसत आहेत.

Exit mobile version