जम्मू-काश्मिरातून कलम ३७० हटवल्यानंतर राज्यातील परिस्थितीत सुधारणा झाली आहे. राज्यात झालेल्या जी- २० बैठकीनंतर परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी राज्यातून अनुच्छेद ३७० हटवून जम्मू- काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवले. गेल्या पाच वर्षात राज्यातील दहशतवादी घटनांमध्ये ५९ टक्के घट झाली आहे. तसेच स्थानिक तरुण देखील दहशतवादापासून लांब होऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यंटकांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
गेल्या वर्षी राज्यात ४ हजार १०० परदेशी पर्यटक आले होते. त्यातुलनेत यंदा परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ दिसून आली. यावर्षी सप्टेंबर २०२३ पर्यंत राज्यात ३२ हजार परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८ टक्के अधिक आहे. राज्यात यंदाच्या मे महिन्यात झालेल्या जी- २० परिषदेपूर्वी १२ हजार परदेशी पर्यटक आले होते. तर सप्टेंबरपर्यंत २० हजार परेदशी पर्यटक आले आहेत.
हे ही वाचा:
ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार
विधानसभा अध्यक्षांना वेळापत्रक देण्यासाठी ३० ऑक्टोबरची नवी मुदत
अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी
‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’
राज्यातून कलम ३७० हटवल्यानंतर पाच वर्षांत काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूच्या प्रकरणांतही ७७ टक्के घट दिसून आली आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक काश्मीरकडे आकर्षित होऊ लागले आहेत. अमेरिका, कॅनडा आणि इतर काही युरोपीयन देशातून हे पर्यटक काश्मीरमध्ये आले आहेत. ट्रॅव्हल ऍडव्हायझरी प्रतिकूल असूनही त्यांनी काश्मीरला भेट दिली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे परदेशी पर्यटकांमध्ये मुळीच भीती दिसत नाही, असे जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाकडून सांगण्यात आले. खोऱ्याला आतापर्यंत देशातील सुमारे १ कोटी ५० लाख पर्यटकांनी भेट दिली आहे.