दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख

मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- हर्णे मार्गावर भीषण अपघात झाला असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दापोली- हर्णे मार्गावरील आसूद येथे ट्रक आणि टमटम अपघातामुळे झालेल्या भीषण दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देण्याचे निर्देशही दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली- हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून त्यांनी या अपघाताची माहिती घेतली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले. तसेच जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

हे ही वाचा:

म्हणे, मुंबईत तासाला ४०० मिमी पाऊस… उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत

एनडीआरएफने २० तासांच्या बचावकार्यानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढले पण मृत्यूशी झुंज अपयशी

कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई

‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’

दापोली- हर्णे मार्गावरील आसूद जोशीआळीजवळील वळणावर दापोलीतून आंजर्लेकडे प्रवासी वाहतूक करणारी टमटम आणि दापोलीकडे येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत टमटम चालक अनिल सारंग यांच्यासह आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सर्व मृत प्रवासी पाजपंढरीजवळील अडखळ येथील आहेत. अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अनिल हे त्यांची डमडम दापोलीतून आंजर्लेकडे १४ प्रवासी घेऊन जात असताना त्यांची डमडम आसूद जोशीआळीनजीक असलेल्या वळणावर आली असता समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बाहेरून टर्न मारल्याने डमडम ट्रकवर आदळली. तेव्हा हा भीषण अपघात झाला.

Exit mobile version