29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

Google News Follow

Related

सियाचीन म्हणजेच जगातील सर्वात उंचावर असणारी युध्दभूमी अशी या जागेची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय दिव्यांग खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक दमदार कामगिरी करत १९ पदक भारताच्या नावे केली. त्यानंतर आता दिव्यांगांच्या टीमने पुन्हा एकदा देशवासीयांची मान उंचावेल, अशी अभिमानस्पद कामगिरी केली आहे. देशातील आठ दिव्यांगांनी सियाचीन ग्लेशियरच्या १५ हजार ६३२ फूट उंचीवर पोहचून जागतिक विक्रम केला आहे.

ऑपरेशन ब्लू फ्रीडम मोहिमेअंतर्गत काही दिव्यांगांनी सियाचीन शिखर सर करण्याचे ठरवले. त्यांच्या टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ‘काँकर लँड एअर वॉटर’ म्हणजेच सीएलएडब्ल्यूवर होती. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी आहे. तिथे तापमान हे शून्य ते उणे ५० डिग्री सेल्सियस इतके कमी असते. वेगाने वाहणारे वारे, शरीर गोठवणारी थंडी, दूरदूरपर्यंत दिसणाऱ्या बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिमनद्या यांच्याशी झुंज देत भारतीय दिव्यांगांच्या टीमने १५ हजार ६३२ फूट उंचीवर पोहचून जागतिक विक्रम रचला.

ही वाचा:

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जमिनीवरच अनधिकृत बांधकामे

नामांकित लेखकांच्या पुस्तकांचे ते करत होते बेकायदेशीर ‘पीडीएफ’

पहिल्या मजल्यावर राहणाऱ्यालाही आता मिळेल घर?

शासनाकडे दोन लाख जागा नोकरभरतीच्या प्रतीक्षेत

दिव्यांगांच्या टीमने १ सप्टेंबरला सियाचीनच्या बेस कॅम्पवरून मोहिमेला सुरुवात केली होती. मोहिमेपूर्वी या संपूर्ण टीमला प्रशिक्षण देण्याचे काम सशस्त्र दलाच्या दिग्गजांच्या चमूने म्हणजेच सीएलएडब्ल्यूने केले होते. प्रशिक्षणादरम्यान टीमला स्काय डाईविंग, स्कुबा डायविंग आणि गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सुरुवातीला सियाचीन ग्लेशियर चढाई मोहिमेसाठी २० जणांची निवड करण्यात आली होती. मात्र, नंतर अंतिम टीममध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.

सियाचीन मोहिमेचा जागतिक विक्रम केल्यावर ही टीम आता मालदीवच्या समुद्रात स्कुबा डायविंग आणि दुबईमध्ये पॅराजंपिंग करून आणखी दोन विश्वविक्रम नावावर करण्याच्या तयारीत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा