शाहजहान शेखच्या अटकेनंतर आठ दिवसांनी संदेशखालीतील पोलिस ठाण्याच्या प्रभारीची बदली!

गोपाल सरकार यांची नियुक्ती

शाहजहान शेखच्या अटकेनंतर आठ दिवसांनी संदेशखालीतील पोलिस ठाण्याच्या प्रभारीची बदली!

स्थानिक तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा व जमीन हडपल्याचा आरोप होत असतानाच शनिवारी संदेशखाली पोलिस ठाण्याचे प्रभारी विश्वजीत शांपुई यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी गोपाल सरकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोपाल याआधी बशीरहाट पोलिस जिल्ह्यात ओसी म्हणून कार्यरत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी या बदलीला नियमित प्रशासकीय कारवाई संबोधले आहे.

१ मार्च रोजी शाहजहान शेख याला अटक केल्यानंतर राज्य सरकारने बशीरहाट पोलिस जिल्ह्यातून दोन अधिकाऱ्यांना हटवले आहे. संदेशखालीमध्ये लैंगिक अत्याचार व जमीन हडपल्याप्रकरणी मुख्य आरोपी शाहजहान शेख ५५ दिवसांपासून फरार होता. त्याला पोलिसांनी ५ जानेवारी रोजी ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण राज्य सरकारने सीआयडीला सोपवले होते.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच रामनवमीला सुट्टी!

‘सन २०१८मध्ये एनडीएशी फारकतीचे कारण केवळ राजकीय’

निवडणूक आयुक्त अरुण गोएल यांचा तडकाफडकी राजीनामा!

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राची हत्या

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी सीबीआयने प. बंगाल सीआयडीकडून शाहजहान शेख याचा ताबा घेतला होता. शाहजहान शेख तृणमूलचा शक्तिशाली नेता मानला जातो. तो संदेशखाली युनिटचा टीएमसी अध्यक्षही राहिला आहे. प. बंगालमधील कोट्यवधीच्या धान्य घोटाळ्याप्रकरणी संदेशखालीतील शाहजहान शेख याच्या घरावर छापा टाकण्यासाठी ५ जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी गेले होते. तेव्हा जमावाने ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता.

या जमावाला हल्ल्यासाठी उकसवल्याचा ठपका शाहजहानवर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तो फरार झाला. मात्र त्यानंतर संदेशखालीतील अनेक महिलांनी त्याच्यावर आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तसेच, त्यांची जमीन जबरदस्तीने बळकावल्याचा आरोपही या महिलांनी केला होता. आता शाहजहान याचा ताबा सीबीआयकडे असून ते त्याची कसून चौकशी करत आहेत.

Exit mobile version