नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

नीरज चोप्राचा ‘असा’ होणार सन्मान

शनिवारी संंपूर्ण भारताला एक नाव परिचयाचं झालं. सोशल मीडियावर या व्यक्तीच्या फोटोंचा पाऊस पडत होता. ती व्यक्ती म्हणजे नीरज चोप्रा. टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजने इतिहास रचला. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसाला आणखी खास करण्यासाठी भारतीय एथलेटिक्स महासंघाने दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी  देशभरात राज्य स्तरीय भालाफेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

भारताने यंदा ऑलिम्पिकमध्ये ७ पदकं जिंकली. पण यामध्ये केवळ एकच सुवर्णपदक होतं. तेही व्यक्तिगत स्पर्धेत नीरज चोप्राने मिळवलेलं. यापूर्वी भारताच्या अभिनव बिंद्रा याने २००८ मध्ये निशानेबाजीत सुवर्णपदक मिळवलं होतं. त्यामुळे अशी ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरजवर संपूर्ण देशांतून बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

नीरज चोप्राने या घोषणेवर आनंद व्यक्त कर ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाला धन्यवाद म्हटले. तो म्हणाला, ‘मला हे ऐकून फार आनंद होत आहे. मी भारतीय एथलेटिक्स महासंघाला धन्यवाद देऊ इच्छितो. मला आनंद आहे की मी माझ्या देशासाठी एक प्रेरणा बनलो आहेत. मला पाहून लहानगे प्रेरीत होणार याचा मला आनंद आहे.”

हे ही वाचा:

पुणे मेट्रो विरोधकांना उच्च न्यायालयाचा फटकार

तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर

काय आहेत आयपीएलसाठीचे नवे नियम?

भारतात उपलब्ध होणार आणखी एक लस!!

या ऐतिहासिक विजयानंतर नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

Exit mobile version