७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे गाणे अमिताभ, सोनू निगम, विराटच्या मुखी

७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे गाणे अमिताभ, सोनू निगम, विराटच्या मुखी

भारत स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी, सांस्कृतिक मंत्रालयाने ‘हर घर तिरंगा’ हे विशेष गीत प्रसिद्ध केले. यामध्ये सिनेमा, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अनेक बड्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. सर्वसामान्य जनतेपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत लोक या गाण्यात सामील आहेत.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या गाण्याला आपला आवाज दिला. अनुष्का शर्मा, विराट कोहली, अनुपम खेर, आशा भोसले, सोनू निगम, अजय देवगण, प्रभास, अक्षय कुमार, हार्दिक पांड्या, नीरज चोप्रा आणि पीव्ही सिंधू, मिताली राज, मेरी कॉम, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, अनेक खेळाडू आणि अनेक सेलिब्रेटी या गाण्यामध्ये आहेत. व्हिडीओच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती सुद्धा दिसली आहे.

गाण्यामध्ये भारताचे चैतन्य, सामर्थ्य आणि विविधतेचे प्रदर्शन, क्रीडा, क्षेपणास्त्र प्रक्षेपण, सैन्यापासून ते योग पर्यंत असं सर्वच या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे. या गाण्यात देशातील सर्व ठिकाण, संस्कृती दाखवण्याचा पर्यंत करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.

हे ही वाचा:

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर

देवी श्री प्रसाद यांनी या गाण्यातही आपली भूमिका साकारली आहे. या गाण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “मला ही संधी मिळाली याचा मला खूप अभिमान आणि सन्मान वाटतो. हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. या लोकांसोबत काम केल्याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटते. मी केलेल्या टॉप दहा गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे जी मला कायम लक्षात राहील.

Exit mobile version