दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा पुण्यात बजाज अलियान्झने पुणे हाफ मॅरेथॉन आयोजित केले. नेहमीप्रमाणे ह्या वर्षीही ह्या मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु या वर्षी काही आश्चर्यकारक स्पर्धक आपल्याया पाहायला मिळाले आहेत.
‘ते’ त्यांच्या मित्रांसोबत मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आणि ‘झुंबा’ वर व्यायामाची तयारी ही केली. स्पर्धा सुरू झाल्यावर सगळ्यांसोबत तेही धावू लागले आणि त्यांनी ५ किलोमीटरची धाव अगदी वेळेत पूर्ण केली, हे सर्व तरुणांबद्दल नाहीत तर ज्येष्ठ नागरिक श्रीपत मोरे ह्यांच्या बद्दल आहे. श्रीपत मोरे ह्यांने वयाच्या ७५ व्या वर्षी शरीराने वृद्ध पण मनाने तरुण असल्याचे हे विधान खरं आहे हे पटवून दिले आहे. मोरे हे दहा वर्षांपासून धावण्याचा सराव करत आहेत. आणि ह्या सरावाने त्यांना या मॅरेथॉन मध्ये मेडल पटकवायला मदत केली. त्यांनी ५ किमी चा ट्रॅक वेळेत पूर्ण केल्याने त्यांनी जनतेचे मन जिंकले आहे. धावणे, व्यायाम, खेळ आणि शर्यती हे सर्व फक्त तरुणांसाठी आहे हा समज खोटा ठरवला आहे. त्यांच्या ह्या कृतींना देशातल्या प्रत्येक नागरिकाला धावण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मुलीचा कुचिपुडी डान्स व्हायरल
पंतप्रधान मोदींना धमकी देणाऱ्याला गुजरातमधून अटक
फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही …!
शिंदे गटातील आमदारांनो प्लिज नाराज व्हा ना!
बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन (बीएपीएचएम) हे दर वर्षी आयोजित केलेला मॅरेथॉन आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मॅरेथॉन खेळवली जातात. . हाफ मॅरेथॉन, ५किमी , १०किमी , ३ किमी – फन अँड फॅमिली रन असे विविध धावण्याच्या शर्यती आहेत. ह्या वर्षी बीएपीएचएम ह्याची ३ आवृत्ती आहे. कोविडच्या नंतर ही पहिली मॅरेथॉन आहे ज्यात अनेक लोकांनी भाग घेतला. परंतु त्या अनेक लोकांमध्ये श्रीपत मोरे ह्या ‘तरुनाणे’ लोकांच्या मनामध्ये छाप पाडली.