जम्मू काश्मीरात मारले गेलेले ६० टक्के दहशतवादी ‘पाकडे’

भारतीय लष्कराने दिली माहिती

जम्मू काश्मीरात मारले गेलेले ६० टक्के दहशतवादी ‘पाकडे’

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत एकूण ७५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी ६० टक्के हे पाकिस्तानचे होते, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. आपल्या देशात आर्थिक समस्या असतानाही पाकिस्तानी लष्कर दहशतवादी रचनेला पूर्ण पाठिंबा देत आहे हे ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, यावर्षी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या ७५ आहे. या आकडेवारीची सरासरी काढली असता सुरक्षा दलाने दर पाच दिवसाला एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे दिसून येते. आतापर्यंत मारल्या गेलेल्या ७५ पैकी बहुतांश विदेशी दहशतवादी होते.

हे ही वाचा : 

संजय राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते!

कुत्र्याच्या पिल्लाचा विनोदी पद्धतीने वापर

दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!

यामध्ये नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) घुसखोरीचा प्रयत्न करताना ठार झालेल्या १७ दहशतवाद्यांचा आणि अंतर्गत भागात झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या २६ दहशतवाद्यांचा समावेश आहे. वाढत्या दहशतवादी धोक्याला आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांच्या कारवाया महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.

ही संख्या जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक दहशतवाद्यांच्या उपस्थितीत लक्षणीय घट दर्शवते आणि मुख्यतः पाकिस्तानी दहशतवादी या प्रदेशात सक्रिय आहेत. “स्थानिक दहशतवादी गट जवळपास नेस्तनाबूत झाला आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. २०२४ मध्ये, जम्मू आणि काश्मीरमध्ये ६० दहशतवादी घटनांमध्ये एकूण १२२ लोक मारले गेले, ज्यात ३२ नागरिक आणि २६ सुरक्षा दलांचे कर्मचारी होते.

Exit mobile version