भारतात जगातील सगळ्यात मोठी कोरोना विरोधातील लसीकरण मोहीम सुरु आहे. सुरवातीपासूनच या लसीकरण मोहिमेत आपला देश अनेक नव नवे विक्रम रचताना दिसत आहे. नुकताच भारताने या लसीकरण मोहिमेत आणखीन एक महत्वाचा टप्पा पार केला असून भारतातले ७५ टक्के प्रौढ नागरिक हे लसवंत झाले आहेत. भारतातील प्रौढ नागरिकांपैकी ७५% नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन पूर्ण झाले आहेत.
भारताने आत्तापर्यंत १६५ कोटींपेक्षा अधिक कोविड लसीचे डोस दिले असून १५ वर्ष वयापासून पुढील सर्व नागरिकांना कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारताने या लसीकरण मोहिमेतही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आणि उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने अस्सल भारतीय बनावटीची लस बनवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मॉक ड्रिलमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाने गमावला पाय
सामूहिक बलात्काराने पेण हादरले; सात जणांना घेतले ताब्यात
कोर्ट ‘मविआ’ला दिलासा का देत नाही?
भारताने साध्य केलेल्या या नव्या विक्रमाच्या संदर्भात भारताचे आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विटरच्या माध्यमातून या संबंधीची माहिती दिली आहे. ‘सब का साथ, सब का प्रयास’ या मंत्रानुसार भारताने आपल्या ७५% प्रौढ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण अधिकाधिक मजबूत होत आहोत. आपण सगळ्यांनी नियमांचे पालन करायला हवे जाणीव लावकारफात लवकर लस घ्यायला हवी असे मांडवीय यांनी म्हटले आहे.
तर [पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्या कामगिरीसाठी सर्वांचे कौतुक केले आहे. लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचा अभिमान वाटतो असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.