कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने गाठला ७१ दिवसांचा नीचांक

कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येने गाठला ७१ दिवसांचा नीचांक

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत पाच हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात ६७ हजार २०८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात २ हजार ३३० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याने दिलासाही आहे. विशेष म्हणजे सक्रिय रुग्णसंख्या गेल्या ७१ दिवसांतील नीचांकी आकड्यावर आहे. ८ लाख २६ हजार ७४० इतके सध्या ऍक्टिव्ह कोरानाग्रस्त आहेत.

गेल्या २४ तासात भारतात ६७ हजार २०८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ३३० रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात १ लाख ३ हजार ५७० जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २ कोटी ९७ लाख ३१३ वर गेला आहे. देशात २ कोटी ८४ लाख ९१ हजार ६७० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख ८१ हजार ९०३ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर ८ लाख २६ हजार ७४० इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा :

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २६ कोटी १९ लाख ७२ हजार १४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. गेल्या २४ तासात २८ लाख ४५८ जणांना लसीकरण करण्यात आले.

Exit mobile version