तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?

तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण PMAY- G (Pradhan Mantri Awaas Yojana- Gramin) योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. १ लाख ४७ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर ७०० कोटी जमा केले आहेत. मोदींनी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाभार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद साधला.

लाभार्थ्यांना पहिला हप्ता ३८ हजार रुपयांचा देण्यात आला. दरम्यान लाभार्थ्यांशी बोलताना त्यांच्याकडून कोणी लाच तर घेतली नाही ना असा प्रश्नही मोदींनी विचारला.

व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दुपारी एक वाजता पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांना पहिला हप्ता मोदींच्या हस्ते पाठवण्यात आला. एकूण ७०० कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. लाभार्थ्यांशी संवाद साधताना मोदींनी म्हटलं की, या हप्त्याचे पैसे इतर कुठेही खर्च करू नका, घर बांधा, पुढच्या हप्त्याचे पैसेही खात्यावर जमा होतील, असे मोदी म्हणाले. लाभार्थ्यांना घरकुल योजनेत नाव यावं यासाठी तुमच्याकडे कोणी पैसे मागितले का असा प्रश्न विचारला. तुमचा हक्क मिळवून देणे ही आमची जबाबदारी आहे, असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब

… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन

त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही

‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना घरे बांधण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.

Exit mobile version