31 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषमागच्या सीटवर बसणारे ७० टक्के लोक बेल्ट्स लावतच नाहीत

मागच्या सीटवर बसणारे ७० टक्के लोक बेल्ट्स लावतच नाहीत

सोमवारी केलेल्या सर्वेक्षणातून ७० टक्के लोक मागचा सीटबेल्ट वापरत नसल्याचे समोर आले आहे.

Google News Follow

Related

भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील दोन प्रतिष्ठित नागरिकांचे वाहन अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी टाटा समूहांचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार डिव्हायडरला आदळून मिस्त्री यांचा मृत्यू झाला. मिस्त्री यांनी सीट बेल्ट न लावल्याने त्यांचा मृत्यू झाल असे म्हटले जात आहे. मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीट बेल्टचा वापर केल्यास अपघातात त्यांचा बचाव होऊ शकतो. पण मागच्या सीटवर बसलेले लोक बेल्ट्सचा वापर कमी प्रमाणात करत असल्याचा अहवाल समोर आला आहे.

सोमवारी भारतभर झालेल्या एका ऑनलाइन सर्वेक्षणात आकडेवारी समोर आली आहे. १०,००० पेक्षा जास्त नागरिकांपैकी ७० टक्के नागरिक मागील सीट बेल्टचा वापर करत नाहीत. तसेच मागील दोन अपघातामध्ये रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला आणि १५ ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांमध्ये वाहनाच्या समोरच्या भागाची टक्कर झाली, सीट बेल्ट लावलेल्या व्यक्तीला कमी प्रमाणात दुखापत झाली आहे. दिल्लीमध्ये २०१४ मध्ये झालेल्या अपघातात गोपीनाथ मुंडे यांच्या वाहनाला डाव्या बाजूने टक्कर लागली होती. त्यात ते मागच्या बाजूला बसले असताना सीट बेल्टचा वापर केला नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असे समोर आले होते.

या वर्षीच्या एका अहवालात जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने मागील सीटवर बसलेल्या नागरिकांनी सीट बेल्टचा वापर केला असल्यास मृत्यूचा धोका २५ टक्के ते ७५ टक्के कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. भारतातील २७४ जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलेल्या १०,५९८ पैकी फक्त २६ टक्के नागरिक मागच्या रांगेतील सीट बेल्टचा वापर करत  असल्याचा सांगितले. तर काही नागरिक सीट बेल्टला निरूपयोगी समजतात, वाहतूक पोलिसांनी जनजागृती करून नागरिकांना मागच्या सुरक्षा सीट बेल्टचे महत्व कळवावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे ही वाचा:

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी

१४ हजार ५०० शाळांसाठी ‘पीएम श्री स्कुल्स’ स्मार्ट योजनेची घोषणा

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

वाहन अपघाताच्या तीव्रतेमध्ये मागे बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्टचा वापर केला नसल्यास मागील व्यक्ती समोरच्या काचेवर आदळू शकते तसेच पुढील सीटवर बसलेली व्यक्ती वाहनाच्या डॅशबोर्डवर आदळण्याची शक्यता असते. वाहन अपघातामध्ये व्यक्तीच्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने मृत्यूचा धोका अधिक असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा