इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार

इस्राइलच्या बॉम्बवर्षावात गाझातील ७० लोक ठार

इस्राइल आणि गाझा पट्ट्यामधील हमास दहशतवादी संघटना यांच्यातील युद्ध थांबायचं नाव घेत असून त्याची तीव्रता अधिक वाढत चालली आहे. अशातच जगभरात ख्रिसमसचा जल्लोष असताना ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपासून पुन्हा इस्रायलने गाझावर बॉम्बचा वर्षाव केलं आहे. या हवाई हल्ल्यात सुमारे ७० लोक ठार झाले असून त्यात अनेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.

इस्राइल आणि हमास यांच्यात गेले ८० दिवस जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हवाई हल्ले आणि जमिनीवरून हल्ले सुरू आहेत. दरम्यान, ख्रिसमसच्या दिवशी इस्राइलने गाझामध्ये मोठा हवाई हल्ला केला आहे. यामध्ये लहान मुले महिला यांच्यासह सुमारे ७० जणांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीतील हा हवाई हल्ला सर्वात प्राणघातक मानला जात आहे. पोप फ्रान्सिस यांनी या युद्धाबद्दल खेद व्यक्त केला आहे. गाझामध्ये आतापर्यंत 20 हजारांहून अधिक नागरिक मारले गेले आहेत.

रविवारी मध्यरात्री इस्रायलकडून हवाई हल्ला करण्यात आला आणि सोमवारी सकाळपर्यंत या हल्ल्यांची मालिका सुरू होती. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हमास संचालित गाझामधील आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, इस्राइलने केलेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ७० लोक मारले गेले आहेत. निर्वासितांच्या छावणीला लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. अनेक घरांना याचा फटका बसला आहे. माहितीनुसार, मृतांची संख्या २० हजार पार झाली असून त्यात दोन तृतीयांश महिला आणि मुले आहेत.

हे ही वाचा:

चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!

अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली

जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!

पराभवानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात फिरकल्याच नाहीत

हमास शासित गाझामधील अधिकाऱ्यांनी आतापर्यंत २० हजार ४०० हून अधिक लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ढिगाऱ्याखाली दबून हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती भयावह असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे.

Exit mobile version