28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषराजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!

राजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!

ओव्हरटेकच्या प्रयत्नात झाला अपघात

Google News Follow

Related

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात रविवारी (१४ एप्रिल) दुपारी घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांच्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.ट्रकच्या धडकेने कारला लागलेल्या आगीमुळे एका कुटुंबातील दोन मुले आणि तीन महिलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारमधील सर्व प्रवासी उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी असून, राजस्थानमधील सालासर येथील सालासर बालाजी मंदिरातून परतत असताना हा अपघात झाला.कार चालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना घडली.विरुद्ध दिशेकडून दुसरे वाहन आले असता, धडक टाळण्यासाठी कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार ट्रकला धडकली.धडकेनंतर कारमधील गॅस किटला आग लागली आणि ट्रकमध्ये कापूस भरला असल्यामुळे आग आणखीनच भडकली.

हे ही वाचा:

के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

काँग्रेससाठी जाहीरनामा फक्त कागद पण आमच्यासाठी ‘मोदींची गॅरेंटी’!

ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून इस्रायलवरील इराणच्या हल्ल्याचा निषेध!

अपघातावेळी उपस्थित असणारे रामनिवास सैनी यांनी सांगितले की, कारमधील प्रवासी मदतीसाठी ओरडत होते पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही.कारचे दरवाजे बंद होते अन आगीचे प्रमाण देखील वाढल्याने प्रवाशांना बाहेर काढता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता.

नीलम गोयल (५५), तिचा मुलगा आशुतोष गोयल (३५), मंजू बिंदल (५८), तिचा मुलगा हार्दिक बिंदल (३७), त्याची पत्नी स्वाती बिंदल (३२) आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुली अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, ट्रक चालक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा