छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी(३० एप्रिल) सुरक्षा दलांसोबत चालू असलेल्या चकमकीत आतापर्यंत सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.या चकमकीत ठार झालेल्या सात नक्षलवाद्यांमध्ये दोन नक्षलवादी महिलांचा समावेश आहे.
छत्तीसगडचे पोलिस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले की, चकमकीच्या ठिकाणाहून एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबवली जात असून अजूनही चकमक सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?
नाशिक: एसटीची ट्रकला धडक, १० जण ठार!
‘मोदी पाठून हल्ला करत नाही जे करतो ते उघडपणे करतो’
“भारत जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहतोय तर, पाकिस्तान दिवाळखोरी टाळण्यासाठी भीक मागतोय”
नारायणपूर कांकेर सीमा भागात अबुझमाडच्या टेकमेटा आणि काकूरच्या मध्य जंगलात ही चकमक सुरू आहे.स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि जिल्हा राखीव दलाकडून शोधमोहीम सुरु आहे.आज सकाळी पहाटेच्या सुमारास ही चकमक सुरु झाली.या चकमकीत एकूण सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून या मध्ये दोन महिलांचा समावेश आहे.सर्व सात मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सुरक्षा दलांनी १५ दिवसांत नक्षलवाद्यांवर केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे.या घटनेसह, नारायणपूर आणि कांकेरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या राज्याच्या बस्तर प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत या वर्षी आतापर्यंत ८८ नक्षलवादी ठार झाले आहेत.१६ एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते.