28 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषनेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्ली, बिहार, सिक्कीममध्ये जाणवले धक्के

नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्ली, बिहार, सिक्कीममध्ये जाणवले धक्के

९५ लोक ठार आणि १३० हून अधिक जखमी

Google News Follow

Related

नेपाळमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले असून भारतातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून यानंतर तिथले लोक घराबाहेर पळताना दिसल्याचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भूकंपा तीव्रता रिश्टर स्केलवर ७.१ इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू गोकर्णेश्वर असून, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, सकाळी ६.३५ वाजता नेपाळमधील लोबुचेपासून ९३ किमी अंतरावर ईशान्य भागात भूकंपाचा धक्का जाणवला. काठमांडू आणि जवळपासच्या जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

नेपाळसह उत्तर भारतातील अनेक राज्ये आणि तिबेटमध्ये आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली. तर तिबेटमध्ये या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली. नेपाळ आणि तिबेटबरोबरच भारतातील दिल्ली, बिहार, सिक्कीम, उत्तर बंगालसह आणखी काही भागात या भूकंपाचे झटके जाणवले. तिबेटमध्ये या भुकंपामुळे जास्त नुकसान झाले आहे. ९५ लोक ठार आणि १३० हून अधिक जखमी झाले आहेत. 

काठमांडू येथील रहिवासी मीरा अधिकारी यांनी सांगितले की, भूकंप झाला तेव्हा मी झोपेत असताना अचानक बेड हलू लागला, मला वाटले की, माझा मुलगा बेड हलवत आहे. मी तितके लक्ष दिले नाही, मग मी पाहिले की खिडकी देखील हलत आहे, त्यानंतर मला वाटले की भूकंप झाला आहे.

हे ही वाचा:

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांचा अखेर राजीनामा

देशमुखांना मारताना आरोपी आनंद लुटत होते, व्हीडिओ काढत होते!

‘आका’ सोरोसला पुरस्कार, कोणाला आठवले यूपीए सरकार ?

पुण्यात मजार बांधणारे झाले मुजोर, दत्त मंदिराजवळच टाकली चादर!

पृथ्वीमध्ये सात टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या प्लेट सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट एकमेकांवर आदळतात, घासल्या जातात. तसेच एकमेकांवर चढतात किंवा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा जमीन हलायला लागते. त्यालाच भूकंप म्हणतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा