‘लीड’ या खासगी एडटेक कंपनीने नुकताच देशातल्या लहान- मोठ्या शहरातील पालकांचे शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण केले. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे मुलांना शाळेत पाठवायला ६७ टक्के पालक तयार आहेत. तर ३३ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवल्यास धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे.
शाळा प्रत्यक्ष सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे ५९ टक्के पालकांनी सांगितले आहे. मुलांना शाळेत पाठविण्यास ६७ टक्के पालकांनी संमती दर्शवली आहे. मुलांसाठी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेतील सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण असावे, असे मत २२ टक्के पालकांनी व्यक्त केले आहे. शाळेत कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळावेत आणि मुलांना खेळूही द्यावे असे मत बहुसंख्य पालकांनी मांडले आहे.
हे ही वाचा:
पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केली ६५१० मीटर उंची
राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘घोड्यां’ना जिंकण्याचा मार्ग मोकळा
डॉक्टरांच्या ‘मार्ड’ने विचारला सवाल… कुठे आहे शैक्षणिक फी माफीचे आश्वासन?
पुण्यात वहिनीवर बलात्कार करून हत्या करणारा दीर अटकेत
देशातल्या काही शहरांमधील पहिली ते दहावीच्या १० हजार ५०० पालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या तरच मुलांना नीट शिक्षण मिळेल असे मतही अनेक पालकांनी व्यक्त केले. शाळेत आरोग्यसुविधा असाव्यात असे ५४ टक्के पालकांचे म्हणणे आहे. मुले प्रत्यक्ष शाळेत गेले तरच त्यांना समाजात वावरण्याचा अनुभव मिळेल असे ६३ टक्के पालकांनी सांगितले.
छोट्या शहरांमधील ४० टक्के मुलांना संगणकाच्या सहाय्याने शिक्षण घेता आले. सर्व शहरांमधील ७० टक्के पालकांचे आपल्या मुलावर लक्ष होते. अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी गेल्या दीड वर्षांचा शाळेचा अनुभव फारसा चांगला नव्हता. स्मार्टफोन आणि इंटरनेटअभावी त्यांचे बरेच शैक्षणिक नुकसान झाले त्यामुळे आता शाळा सुरू करणे जरुरी असल्याचे ‘लीड’चे सह- संस्थापक सुमित मेहता यांनी सांगितले.