पुण्यमध्ये ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना संपन्न झाला. नांदेडचा शिवराज राक्षे आणि सोलापूरचा महेंद्र गायकवाड यांच्यातील लढतीत शिवराजने महेंद्रला एका मिनिटात पराभूत करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. या कुस्ती स्पर्धेला कुस्ती रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम पैलवानांना आनंदाची बातमी दिली. राज्य सरकारने कुस्तीपटुंच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा आपल्या भाषणात केली.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच मेडल मिळवणार. आपल्या राज्यात खेळाडूंना २ वर्षांपासून मानधन मिळत नाहीय. जे ६ हजार मानधन मिळत होते ते आता २० हजार करण्यात येणार आहे. वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार मानधन आहे ते आता साडे सात हजार करु असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि तुमच्या मदतीने आम्ही असे खेळाडू तयार करू की, येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारा कोणताही पैलवान, कुस्तीगीर फक्त महाराष्ट्राचाच असेल . महाराष्ट्र सरकार आणि आमचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यासाठी नक्कीच पुढाकार घेतील.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
आपल्या खेळाडूंच्या वेतनात तीनपट किंवा त्याहून अधिक वाढ करण्याचा निर्णय घेत आहे. सरकारकडून काही मदत मिळावी, म्हणून आम्ही वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर आगामी काळातही पूर्वीप्रमाणेच तीन खेळाडूंना पोलीस उपअधीक्षक पदावर थेट नोकरी दिली जाईल. आपल्या खेळाडूंना विविध ठिकाणी नोकऱ्या आणि संधी राज्य सरकार देईल असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.