30 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेषराज्यातील ६५ टक्के बिबट्यांनी जंगल सोडले!

राज्यातील ६५ टक्के बिबट्यांनी जंगल सोडले!

Google News Follow

Related

पुणे जिल्ह्यांतील लहान- मोठ्या गावांबरोबरच शहरांच्या हद्दीलागत बिबट्यांचा वावर वाढला आहे. सार्वजनिक अस्वच्छता आणि भटक्या प्राण्यांमुळे बिबटे आता शहरांच्या हद्दीलगत येण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यांत आढळणाऱ्या बिबट्यांपैकी ६५ टक्के बिबटे हे राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये आणि राखीव जंगलाऐवजी मानवी वसाहतींजवळ वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांच्या हद्दीलगत बिबट्या येण्याचे प्रमाण वाढत जाणार असल्याची शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

मुंबईतील बोरिवली, गोरेगाव येथील सोसायट्यांच्या परिसरात बिबळ्यांच्या वावर सहज दिसत असतो. जुन्नरमध्ये दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याने घरात शिरून महिलेवर हल्ला हल्ला केला होता. यामुळे मानवी वस्तीतील बिबळ्यांचा वाढता वावर चर्चेत आला आहे. त्यामुळे या बिबळ्यांना पिंजऱ्यात पकडून पुन्हा जंगलात सोडण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पुण्यात लॉकडाऊनपासून बिबट्या दिसत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

राणीच्या बागेत पाळले जाताहेत ‘पांढरे हत्ती’

प्रवाशांना लुटणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांना आवर घालणार का?

बापरे!! मुंबईत ४८ इमारती प्रतिबंधित

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पीडितेच्या मदतीला गेल्याने आव्हाड संतापले

पुण्यातील हडपसर, ऊरुळीकांचन, वडगाव, मावळ, हिंजवडी, पौड या भागांमध्ये रात्री उशिरा आणि सकाळी लवकर शेतालगतच्या रस्त्यांवर बिबळ्या दिसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एनडीए परिसरातील जंगलात बिबट्या दिसल्याच्या चर्चांनी मध्ये जोर धरला होता. सिंहगड किल्ल्याला लागून असलेल्या डोंगररांगांमध्ये बिबट्याचे वास्तव्य असल्याचे सचित्र पुरावे अभ्यासकांना मिळाले आहेत.

‘स्टेट्स ऑफ लेपर्ड इन इंडिया २०१८’ या केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशातील बिबळ्यांच्या संख्येत गेल्या दहा वर्षांत साठ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. देशात २०१४ मध्ये ७ हजार ९१० बिबळे होते. त्यानंतरच्या चार वर्षांत त्यांची संख्या १२ हजार ८५२ वर गेली.

बिबट्या हा काळानुसार स्वतःला बदलत असतो. विस्तारलेली उपनगरे, ग्रामीण भागातील वाढती कचऱ्याची समस्या आणि या कचऱ्यामुळे वाढलेली भटक्या प्राण्यांची संख्या यामुळे मानवी वस्तीत बिबळ्यांचा वावर वाढला आहे. भटक्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याशिवाय बिबळ्यांचा वावर कमी होणार नाही, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा