केरळमध्ये गेल्या पाच वर्षांत एका दलित मुलीचे ६४ जणांनी लैंगिक शोषण केल्याचा दावा तिने स्वतः केला आहे. तिच्या या दाव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुपदेशन सत्रावेळी संबंधित मुलीने हा खुलासा केला. त्यानंतर बाल कल्याण समितीने केलेल्या तक्रारीनंतर पठाणमथिट्टा पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.
महिला समक्य नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्या नियमित क्षेत्र भेटीचा भाग म्हणून मुलीच्या घरी पोहोचल्यावर ही बाब उघडकीस आली. मुलीने पाच वर्षांमध्ये अनुभवलेल्या भयावहतेचे कथन केल्यानंतर एनजीओने पथनामथिट्टा जिल्ह्यातील बालकल्याण समितीकडे याची तक्रार केली. समितीने या मुलीला समुपदेशन दिले आणि तिने मानसशास्त्रज्ञांसमोर खुलासा केला. तिच्या समुपदेशन सत्रादरम्यान, मुलीने दावा केला की ती केवळ १३ वर्षांची असताना तिच्या शेजाऱ्याने तिच्यासोबत अत्याचार केला होता. सध्या तिचे वय १८ आहे.
हेही वाचा..
हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!
‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला
काय होईल ते होईल, आम्ही सगळ्या पालिका निवडणुका स्वबळावर लढू!
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी अमृतमयी गो भारती संमेलन, वनवासी कल्याण आश्रमचे कार्यक्रम
तिच्या शाळेत खेळात सक्रिय असलेल्या या मुलीने प्रशिक्षण सत्रादरम्यान लैंगिक शोषणाच्या घटनाही उघड केल्या. तिने हे देखील उघड केले की तिचे काही व्हिडिओ प्रसारित केले गेले होते आणि या शोषणामुळे तिच्यावर होणाऱ्या आघातामध्ये भर पडली. आतापर्यंत १० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचे सविस्तर जबाब नोंदवले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रार दाखल करणारे समितीचे पथनमथिट्टा जिल्हा अध्यक्ष एन. राजीव यांनी सांगितले की, समिती मुलीला आवश्यक ती काळजी आणि संरक्षण देईल. प्रकरण गंभीर आहे. मुलगी ८ वीत असताना सुमारे पाच वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले जात होते. ती खेळात सक्रिय होती आणि सार्वजनिक ठिकाणीही तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.