लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!

त्रिपुरामध्ये सर्वाधिक तर बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६४.२१% मतदान!

लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा दुसरा टप्पा आज पार पडला.१३ राज्यांतील लोकसभेच्या ८८ जागांसाठी मतदानाची वेळ संध्याकाळी ६ वाजता संपली.दरम्यान, देशभरात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७६.२३ टक्के मतदान झाले.महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी ५३% मतदान झाले आहे.

महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदान पार पडेल.राज्यातील या आठ मतदारसंघात सरासरी ५३.५१ टक्के मतदान झाले आहे.राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात ५६.४९ टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात ५२.०३ टक्के इतके मतदान झाले आहे.

हे ही वाचा:

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

स्वामी विवेकानंद शाळेने जिंकले विजेतेपद

सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयीन कोठडीत वाढ!

उद्धव ठाकरे म्हणतात, यंदा ‘पंजा’ला मी करणार पहिल्यांदा मतदान

देशाचा विचार केला तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७६.२३ टक्के मतदान झाले.तर महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी ५३% मतदान झाले आहे.

Exit mobile version