६३ वर्षीय अवयव दात्यांकडून ३ जणांना जीवनदान

अवयवदानातून वाचले तीन रुग्णांचे प्राण

६३ वर्षीय अवयव दात्यांकडून ३ जणांना जीवनदान

भारतात हळूहळू अवयव दानाची चळवळ मोठ्या प्रमाणात विस्तारात असल्याचे दिसून येते. अवयवदानाची अशीच एक घटना नवी मुंबई येथील वाशी मधील एमजीएम रुग्णालयात मंगळवारी घडली. त्यामध्ये अलिबाग येथील ६३ वर्षीय अनंत कडवे यांचा ब्रेनडेडमुळे मृत्यू झाला त्यानंतर कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे ३ जणांना जीवनदान मिळाले आहे.

ब्रेनडेड अनंत कडवे यांच्या मृत्यूनंतर अवयवदानातून दोन किडन्या आणि यकृत दान केले आहे. त्यामुळे तीन रुग्णांना नवीन जीवनदान मिळाले आहे. तसेच अनंत यांचे कुटूंबीयानी अवयवदान केल्या नंतर ‘आमचे काका गेले असले तरी अवयवरुपी जिवंत असल्याचे भावना त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच अवयवदानाचा निर्णय घेतल्यानांतर कुटुंबीयांनी रुग्णालयाला पत्र लिहून आपल्या भावनांची वाट मोकळी करून दिली. तसेच त्या पत्रावर कडवे कुटुंबातील पत्नी, मुला-मुलीसह पुतणी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे ही वाचा:

वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३

मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!

चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही

तसेच कडवे यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तसेच माझ्या काकांना पक्षघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. मृत्यूनंतर डॉक्टरांनी अवयवदानाबद्दल माहिती दिली होती. कुटुंबीय एकत्रित येत अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. अवयवदानामुळे रुग्णाचे आयुष्य कसे बदलले हे जवळून पहिले आहे असे विधान पुतणी सुप्रिया शेळके यांनी केले. जरी त्यांच्या जाण्याने कुटूंबाला दुःख झाले असले तरी कडवे यांच्या अवयवदानामुळे तीन नागरिकांना जीवनदान मिळाले आहे. त्यामुळे प्रथमचह कडवे यांच्या गावी अवयवदान करण्यात आले असून, कुटूंबियातील इतर सदस्यांनी सुद्धा अवयवदानाचा संकल्प केला आहे.

Exit mobile version