आपण जिथे जन्मलो,वाढलो,तिथेच शिक्षण घेतेले मात्र आपल्याला कळाले की आपण तिथले नागरिकच नाही तर आपल्याला कसे वाटेल.असाच प्रकार एका अमेरिकेतल्या डॉक्टरसोबत घडला आहे.सियावश सोभानी यांचा जन्म अमेरिकेत झाला. ते आता ६१ वर्षाचे आहेत.त्यांनी आपले सर्व शिक्षण तिथेच घेतले आणि डॉक्टर झाल्यानंतर गेली ३० वर्षे ते तिथेच प्रॅक्टिस करत आहेत. पण जेव्हा त्याने पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी अर्ज केला तेव्हा त्याला धक्का बसला. त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण तर झालेच नाही, उलट त्याचे नागरिकत्वही रद्द करण्यात आले.
६१ वर्षीय डॉक्टर सियावश सोभानी यांनी पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला तेव्हा त्यांना चुकून नागरिकत्व देण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र आता ते अमेरिकेचे नागरिक नाहीत. महत्वाचे म्हणजे, सियावश सोभानी यांनी यापूर्वी देखील पासपोर्टचे नूतनीकरण केले आहे.सियावश सोभानी याना परराष्ट्र विभागाकडून एक पत्र मिळाले त्या पत्रात म्हटले आहे की, सुभानी यांना लहान मूल म्हणून चुकून नागरिकत्व देण्यात आले होते,सुभानी यांचे वडील त्यावेळी इराणच्या दूतावासाचे राजदूत असल्याने त्यांना हे नागरिकत्व मिळणे अपेक्षित नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.नियमांनुसार, यूएसमध्ये, राजनैतिक प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीला मूल असल्यास, त्याला जन्माच्या आधारावर नागरिकत्व दिले जाऊ शकत नाही.
हे ही वाचा:
राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची पुन्हा धुरा
फेसबुक लाईव्हवरून काम करणाऱ्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्याला शिकवू नये!
मणिपूरातील बंडखोर गट ‘यूएनएलएफने’ शांतता करारावर केली स्वाक्षरी!
पक्ष प्रमुखच नाहीत, तर पक्षादेश कुठला?
यावर सुभानी म्हणाले की, “हे माझ्यासाठी धक्कादायक होते, मी एक डॉक्टर आहे, मी माझे संपूर्ण आयुष्य येथे घालवले आहे. मी माझा कर भरला आहे. मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले आहे. मी उत्तर व्हर्जिनियामधील माझ्या समुदायाची सेवा केली आहे. कोविडच्या काळात मी स्वतःला आणि माझ्या पत्नीला धोक्यात घालून माझे कर्तव्य केले. त्यामुळे वयाच्या ६१ व्या वर्षी जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही नागरिक नाही, तेव्हा ते खूप धक्कादायक असते.”
सुभानी म्हणाले की, या प्रकरणी हे सर्व ठीक होण्यासाठी मी अगोदरच ४० हजार डॉलर्स खर्च केले आहेत, मात्र भविष्यात याचे निराकरण कधी होईल याची खात्री नाही, ते म्हणाले.