न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

हरिश साळवेंसारख्या प्रतिष्ठित वकिलांनी उपस्थित केले अनेक मुद्दे

न्यायपालिकेवर टीका करणाऱ्यांविरोधात ६०० वकिलांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र

हरीश साळवे, पिंकी आनंद यांच्यासारख्या तब्बल ६०० प्रतिष्ठित वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र लिहून न्यायपालिकेवर प्रभाव टाकण्याचा काही लोक प्रयत्न करत असून त्यांचे त्यामागे काही हितसंबंध लपलेले आहेत, याविषयी चिंता प्रकट केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयांवर प्रभाव टाकण्याचा ही मंडळी प्रयत्न करत असून विशेषतः राजकीय व्यक्तींसंदर्भातील खटले, भ्रष्टाचाराचे आरोप या बाबतीत असा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे, असे या वकिलांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

वकिलांनी त्यात नमूद केले आहे की, अशा या वर्तणुकीमुळे लोकशाही ढाच्याला धोका निर्माण झाला असून न्यायपालिकेवरील विश्वासाला तडा देण्याचे काम केले जात आहे.

हे ही वाचा: 

पवारांचे फासे उताणे पडतायत…

सॅटेलाइटवरून कापला जाणार टोल; वेळेबरोबर इंधनाची होणार बचत

अरविंद केजरीवालांना १ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी

‘नागरी सेवा परीक्षेसाठी पाच ते आठ वर्षांची तयारी म्हणजे तरुणांच्या ऊर्जेचा अपव्यय’

न्यायपालिकेला धोका या मथळ्याखाली हे पत्र लिहिण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे हितसंबंध जपणारे काही लोक बनावट चित्र उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यायालयांचा एक सुवर्णकाळ होता, असे म्हणत ही मंडळी आताच्या न्यायव्यवस्थेवर आरोप करत आहेत. त्यातून जनमानसात न्यायालयांवरील विश्वास कमी होण्याची भीती आहे.

या वकिलांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ही सगळी मंडळी न्यायालयाच्या निर्णयांवर आपल्याला हवी तशी प्रतिक्रिया व्यक्त करतात. कधी ते त्याची स्तुती करतात तर तो निर्णय पसंत पडला नाही तर त्यावर टीका करतात. आपल्या राजकीय अजेंडाप्रमाणे या प्रतिक्रिया असतात. काही वकील राजकीय नेत्यांचा बचाव करतात आणि न्यायाधीशांवर माध्यमांच्या मार्फत प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न करतात.

Exit mobile version