वक्फ बोर्डाच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. वक्फ बोर्ड विरोधात एकूण ६०० ख्रिश्चन कुटुंबे एकत्र आली आहेत. सरकारी जमीनसह खाजगी जमिनीवरही दावा केल्याच्या वक्फ बोर्डाच्या बातम्या यापूर्वी अनेक समोर आल्या होत्या, येत आहेत. आता तशीच एक घटना केरळमधून समोर आली आहे. ज्यासाठी केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एकूण ६०० हून अधिक ख्रिश्चन कुटुंबे एकत्र येवून वक्फ बोर्ड विरोधात संसदीय समितीकडे तक्रार केली आहे.
कुटुंबांचा आरोप आहे की, वक्फ बोर्ड त्यांच्या जमिनीवर आपली मालमत्ता असल्याचा दावा करत आहे. या कुटुंबाना त्यांच्या जमिनीतून बेदखल होण्याचा धोका आहे. त्यामुळे सिरो-मलबार चर्च आणि केरळ क्याथोलिक बिशप कौन्सिल ख्रिश्चन संघटनांनी वक्फ (दुरुस्ती) विधेयक-२०२४ संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या ‘संयुक्त संसदीय समिती’कडे तक्रार केली आहे आणि या प्रकरणाचे निराकरण करण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा :
१ कोटी ४० लाख जनतेचे जम्मू- काश्मीरमधील अधिकार भाजपाने २०१९ मध्ये १४० करोड लोकांना दिले
ठाणे-मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती, शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीन अनुदान वितरण सुरू!
लेबेनॉनमधील हमासच्या कमांडरलाही इस्रायलने टिपले
मुस्लीम असाल तर खरे नाव लिहा, नाहीतर दुकान बंद केले जाईल!
कोचीमधील चेराई या मासेमारी गावातील सुमारे ६०० कुटुंबे भीतीने जगत आहेत, कारण वक्फ बोर्डाने त्यांच्या जमिनीवर आपली संपत्ती असल्याचा दावा केला आहे. या संदर्भात समितीला आलेले विनंती पत्र केंद्रीय मंत्री किरेन रीजिजू यांनी ट्वीटरवर शेअर करत, तक्रारीचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
केंद्रीय मंत्री किरेन रीजिजू यांनी शेअर करत, यामुळे वाईट वाटत असल्याचे सांगितले. त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले जाईल, असे मी आश्वासन देतो. या प्रकरणावर मंत्री किरेन रीजिजू यांनी संयुक्त संसदीय समितीवर (जेसीपी) विश्वासही व्यक्त केला.
The issue of Waqf land has been affecting people across communities. I feel pained to see eminent Christian leaders having to express their anguish in this manner. I assure them that their grievances will be addressed. pic.twitter.com/8i8wDwXgrv
— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 28, 2024