नागरी सेवा परीक्षा २०२२चा निकाल जाहीर झाला असून त्याचे विश्लेषण केले असता अनेक आश्चर्यकारक बाबी उघडकीस येत आहेत. या परीक्षेत पहिल्या वीसमध्ये आलेल्या उत्तीर्णांपैकी ६० टक्के महिला असून, ४५ टक्के इंजिनीअर तर, ४० टक्के कला शाखांच्या पदवीधर आहेत. तर, यातील २५ टक्के महिला या उत्तर प्रदेशातून आहेत.
पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘या परीक्षेत पहिल्या चार क्रमांकावर महिला असून पहिल्या विसात आलेल्यांमध्ये महिलांचे प्रमाण ६० टक्के आहे. गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम आहे. सहभाग ते नेतृत्व असा हा महिलांचा प्रवास मोदी सरकारच्या कार्यकाळात होऊ शकला, ’ असे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘माझ्या पुतणीचा कुस्तीपटू आंदोलक गैरवापर करत आहेत’
कार्यमुक्त करीत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक
पर्यटन व्यवसायात आता होणार महिलांचे सक्षमीकरण
नागरी सेवा परीक्षा २०२२मध्ये इशिता किशोर, गरिमा लोहिया आणि उमा हराथी या महिला अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी २०२१मध्येदेखील पहिल्या विसात आठ महिला होत्या तर २०२०मध्ये १० महिला होत्या.
पहिल्या विसात आलेल्यांपैकी नऊ जण इंजिनीअर असून एक वैद्यकीय क्षेत्रातील आहे. तसेच, आठ जण हे कला शाखेचे पदवीधर तर दोन विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत.
तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक प्रगतीमुळे हा बदल झाल्याचा दावा त्यांनी केला.तसेच, अन्य नामांकित शाळांच्या तुलनेत केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि अन्य सरकारी शाळांमधून शिकणारे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करत आहेत, याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.
४५ टक्के इंजिनीअर
पहिल्या विसातील ४५ टक्के इंजिनीअर तर ४० टक्के कला शाखेचे विद्यार्थी. पहिल्या विसातले पाच जण उत्तरप्रदेशचे असून बिहार आणि दिल्लीतून प्रत्येकी तीन, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधून प्रत्येकी दोन तर केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि आसाममधून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
पहिल्या २०पैकी १२ महिला
२०२२च्या परीक्षेत पहिल्या विसात १२ महिला असून २०२१मध्ये आठ तर, २०२०मध्ये १० महिल्या पहिल्या विसात होत्या.