भारत – पाकिस्तान सामना कव्हर करायला ६० पाकिस्तानी पत्रकार येणार

पाकिस्तानी पत्रकारांना मिळाला भारताचा व्हिसा

भारत – पाकिस्तान सामना कव्हर करायला ६० पाकिस्तानी पत्रकार येणार

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा थरार सध्या भारतामध्ये रंगला असून १४ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेतील महत्त्वाचा सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये महामुकाबला होणार आहे. दरम्यान, हा सामना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी पत्रकारांना भारताचा व्हिसा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी फक्त पाकिस्तान संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांनाच विश्वचषकासाठी भारताचा व्हिसा मिळाला होता. मात्र, आता पत्रकारांनाही व्हिसा मिळाला आहे.

 

वृत्तानुसार, पाकिस्तानचे ६० पेक्षा अधिक पत्रकार भारत आणि पाकिस्तान सामना कव्हर करण्यासाठी भारतात येणार असून त्यांना व्हिसा मिळाला आहे. ते अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कव्हर करण्यासाठी उपस्थित असणार आहेत.

 

याआधी विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघांना भारताचा व्हिसा मिळालेला असतान पाकिस्तानी संघाला व्हिसा देण्यात आला नव्हता. त्यामुळे यावर चर्चेला उधाण आले होते. अखेर संघाला व्हिसा देण्यात आला आणि त्यानंतर आता पाकिस्तानी पत्रकारांनाही व्हिसा देण्यात आला आहे.

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी पीसीबीचे अध्यक्षदेखील भारतात हजर असणार आहेत. पीसीबीचे अध्यक्ष अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले असून मागील सात वर्षानंतर पहिल्यांदाच पीसीबीचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर येत आहेत.

हे ही वाचा:

इस्रायलकडून वचपा; हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड शाहिद लतिफची पाकिस्तानात हत्या

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ओपनिंग सेरेमनी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी ओपनिंग सेरेमनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाईट शो, डान्स आणि प्रसिद्ध गायक अरजीत सिंह यांचा लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. तसेच काही खास पाहुणे उपस्थित असणार आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासारखे दिग्गज उपस्थित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version