गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.गुजरातमधील पोरबंदरजवळ ४०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं अशी ही संयुक्त कारवाई केली आहे.गेल्या ३० दिवसात गुजरात किनारपट्टीवर ड्रग्स जप्तीची ही मोठी कारवाई आहे.
गुजरातमधील पोरबंदरजवळ ड्रग्सची तस्करी करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेतले आहे.तस्करी करणारे हे सहा पाकिस्तानी नागरिक आहेत.या सर्वाना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्या बोटीची तपासणी केली असता तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचा ड्रग्स साठा सापडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी(१२ मार्च) दिली.ड्रग्सची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा:
लोकसभा निवडणूक : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपली; ९० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा विजेता
राजस्थानमध्ये तेजस विमान कोसळले
दिल्लीत रस्त्यावर नमाज, आता हिंदू संघटनांकडून हनुमानचालिसा!
गुप्त माहितीच्या आधारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) च्या अधिकाऱ्यांनी काल रात्री भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानी नागरिकांना पकडले.यानंतर कारवाई करत सहा पाकिस्तानी आरोपीना अटक केली असून मोठ्या प्रमाणात असलेला ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, गुजरात किनारपट्टीवर ड्रग्स जप्तीची घटना ही गेल्या ३० दिवसांतील दुसरी आहे.
या आधी २८ फेब्रुवारी रोजी गुजरात समुद्र किनारी गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत ३ हजार ३०० किलो वजनाचे हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.