राज्यात ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांना यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, पिशव्यांचा वापर गैरपद्धतीने व्यापारी वर्ग करत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून आर्थिक स्वरूपात दंड वसूल करण्यात आला आहे. १७ जून २०२२ ते आता पर्यंत ठाणे पालिकेने २ हजार ७७६ आस्थापनांवर कारवाई करत १ हजार ७२७ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. यात ६ लाख २७ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
ठाणे महानगर पालिका प्रशासनाकडून हातगाड्यांची झडती घेऊन विविध दुकानांवर छापे घालण्यात आले. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशाव्या आढळलेल्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणात आली आहे. १ जुलैपासून एकेरी वापर होणाऱ्या पिशवीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच वापर करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून
गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक
अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार
मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात
थर्माकोल अधिसूचनेनुसार सर्वसामान्य नागरिकांना दंड म्हणून ५०० रुपये आकारण्यात येणार आहे. फळ व भाजी विक्रेते, दुकानदार, व्यापाऱ्यांकरिता पहिल्यांदा ५ हजार दंड दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास १० हजार, तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास २५ हजार व ३ महिने कारावाची शिक्षेची तरदूत करण्यात आली आहे. ठाणे महानगर पालिकेने या मोहिमेसाठी ५० स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली आहे.